धाराशिव जिल्ह्यात 73.15 लाखांचा गांजा जप्त
छत्रपती संभाजीनगर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची कारवाई
पहा व्हिडीओ
धाराशिव : खरा पंचनामा
जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील धाकटीवाडी येथे छापा टाकून शेतातील सामायिक जागेत लावलेली गांजाची दीडशे किलोची झाडे जप्त करण्यात आली. यामध्ये एकूण 73.15 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती छत्रपती संभाजीनगरच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांनी दिली.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील धाकटीवाडी येथे शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती टास्क फोर्सच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे यांना खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्यांनी त्यांच्या पथकासह स्थानिक पोलिसांना सोबत घेऊन शेतात छापा टाकला. त्यावेळी ज्वारीच्या शेतात ठिकठिकाणी गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली. त्याचे वजन दीडशे किलो भरले. बाजारभावानुसार त्याची किंमत 73.15 लाख रुपये होते. ती झाडे जप्त करून उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पोलीस निरीक्षक गीता बागवडे, पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी, सपोनि पांडुरंग कन्हेरे, सपोनि श्रीकांत ब-हाटे, सहायक निरीक्षक दीपाली पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.