Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवजयंतीला शिवप्रेमींसोबत बाचाबाची भोवली, API ची तडकाफडकी बदली

शिवजयंतीला शिवप्रेमींसोबत बाचाबाची भोवली, API ची तडकाफडकी बदली

जळगाव : खरा पंचनामा 

चाळीसगाव शहरात शिवजयंतीनिमित्त सुरू असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान पोलीस अधिकारी आणि शिवप्रेमी यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची घटना समोर आली.

ही घटना शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरात घडली. शुल्लक कारणावरून सुरू झालेल्या या वादाचे रूपांतर काही वेळातच बाचाबाचीमध्ये झाले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. वादानंतर एपीआय भरत चौधरी यांची बदली करण्यात आल्याची अधिकृत माहिती पोलीस निरीक्षकांकडून देण्यात आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमाच्या दरम्यान एका मुद्द्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी आणि शिवप्रेमी यांच्यात वाद झाला. हा वाद वाढत गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण पसरले. काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होत. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून तत्काळ अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मध्यस्थी केली. त्यांनी दोन्ही बाजूंशी संवाद साधत परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हस्तक्षेपामुळे काही वेळातच तणाव निवळला आणि कार्यक्रम पुन्हा सुरळीत सुरू झाला.

दरम्यान, घटनास्थळी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांची नियंत्रण कक्षात बदली करण्याचे आदेश दिले. ही बदली प्रशासकीय कारणास्तव आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित अधिकाऱ्याची बदली झाल्याची अधिकृत माहिती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी दिली. त्यांनी सांगितले की, सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान शिस्त व सुव्यवस्था राखणे अत्यंत महत्त्वाचे असून, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार खपवून घेतला जाणार नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अधिक दक्षता घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.