कोल्हापूरात काँग्रेसची दमदार सुरुवात; पहिला निकाल बाजुने! जनसुराज्यला धक्का
कोल्हापूर : खरा पंचनामा
जिल्हा परिषद निवडणुकीत स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला पहिल्या निकालात गूड न्यूज मिळाली आहे. घुणकी येथे काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार या जिल्हा परिषदसाठी विजयी झाल्या आहेत.
पंचायत समितीमध्ये नवे पारगावमध्ये काँग्रेसचे भारत वीरधवल पाटील यांनी देखील विजय मिळवला असून घुणकी पंचायत समिती गणातून काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील यांनी विजयी मिळवला आहे. प्राथमिक कलानुसार काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने देखील खाते उघडले असून पंचायत समिती सातवे गणातून राष्ट्रवादीच्या भारती पाटील विजयी झाल्या आहेत. तर, आजरामधून उत्तूर पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीचे विकास चोथे विजयी झाले असून जिल्हा परिषद मतदारसंघातून शिरीष देसाई आघाडीवर आहेत.
गडहिंग्लज तालुक्यातील नूल जिल्हा परिषद मतदारसंघात दुसऱ्या फेरीत जनसुराज्यचे अनिरुद्ध रेडेकर विजयी झाले आहेत. तर, घुणकी बरोबर सातवे जिल्हा परिषद मतदार संघ आणि पंचायत समितीत जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारांचा पराभव झाला.
सातवे गट आणि गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. सातवे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे जयंत पाटील, पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचेच माणिक पाटील विजयी आणि माले पंचायत समिती मतदारसंघातून भारती पाटील विजयी
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.