Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजितदादांच्या हातातील घड्याळाने नव्हे तर या गोष्टीने पटली मृतदेहाची ओळखसीआयडीने केला खुलासा

अजितदादांच्या हातातील घड्याळाने नव्हे तर या गोष्टीने पटली मृतदेहाची ओळख
सीआयडीने केला खुलासा

मुंबई : खरा पंचनामा

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस वाढत असतानाच, आता हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करण्यात आला आहे.

सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली असून, तपासादरम्यान काही खळबळजनक माहिती समोर येत आहे.

आतापर्यंत अशी चर्चा होती की, अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील प्रसिद्ध घड्याळावरून पटली होती. मात्र, सीआयडीच्या तपासात हे वृत्त चुकीचे असल्याचे समोर आले आहे. वरिष्ठ पोलीस सूत्रांनुसार, अपघात इतका भीषण होता की मृतदेहाची ओळख पटवणे कठीण होते. अखेर, दादांच्या कुर्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या एका विशिष्ट कापडामुळे आणि त्यावरील खास डिझाईनमुळे त्यांची ओळख पटली. ज्याला घड्याळ समजले जात होते, तो प्रत्यक्षात शर्टचाच एक जळालेला भाग होता.

केवळ कपड्यांवर विसंबून न राहता, पोलिसांनी कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये, यासाठी सर्व मृतदेहांची DNA (डीएनए) चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच अधिकृतपणे ओळख निश्चित करण्यात आली आणि त्यानंतरच पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.