Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दारू विक्री, वाहतुकीवर कारवाई करताना जखमी झाल्यास आता मिळणार नुकसान भरपाई!राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्य शासनाचा दिलासा

दारू विक्री, वाहतुकीवर कारवाई करताना जखमी झाल्यास आता मिळणार नुकसान भरपाई!
राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्य शासनाचा दिलासा 

मुंबई : खरा पंचनामा 

बेकायदा दारू विक्री, वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करताना झालेल्या हल्ल्यात अनेकदा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, कर्मचारी जखमी होतात. अशा जखमीना शासनाकडून कोणतीही भरीव आर्थिक मदत मिळत नव्हती. मात्र आता राज्य शासनाने जखमी अधिकारी, कर्मचारी यांच्या आर्थिक स्वरूपात नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचे कार्यासन अधिकारी सूरज बेलेकर यांच्या सहीने याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत अवैध दारु विक्री करणाऱ्या तसेच त्याची वाहतुक करणाऱ्या व्यक्तींविरुध्द वेळोवळी कारवाई करण्यात येते. अशी कारवाई करताना अनेकदा संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांवर अवैध दारु विक्री व दारु वाहतुक करणाऱ्याकडून प्राणघातक हल्ले करण्यात येतात. त्यामध्ये अनके वेळा संबंधित अधिकारी/कर्मचारी जखमी होतात, तसेच काही वेळा मृत्यु पावतात. अशा कारवाईमध्ये जखमी झालेल्या अथवा मृत अथवा कायमचे अंपगत्व आलेल्या अधिकारी/कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याबाबत सर्वकष धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत अवैध दारुविक्री व वाहतुकीवर कारवाई करताना मृत्यु पावलेल्या तसेच जखमी वा कायम अपंगत्व आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना व त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई अदा करण्याबाबत शासन मान्यता देण्यात आली आहे.

अशी असेल पदनिहाय नुकसान भरपाई 
जवान/जवान-नि-वाहनचालक/सहायक दुय्यम निरीक्षक : मृत्यू झाल्यास ७.५० लाख रुपये. कायमचे अपंगत्व आल्यास ३ लाख, जखमी झाल्यास २ लाख.
दुय्यम निरीक्षक : मृत्यू झाल्यास ८ लाख, कायमचे अपंगत्व आल्यास ३ लाख, जखमी झाल्यास २.३० लाख.
निरीक्षक/उप अधीक्षक : मृत्यू झाल्यास ९ लाख, कायमचे अपंगत्व आल्यास ३ लाख, जखमी झाल्यास २.६० लाख.
अधीक्षक : मृत्यू झाल्यास १० लाख, कायमचे अपंगत्व आल्यास ३.३0 लाख, जखमी झाल्यास ३ लाख रुपये.
उप आयुक्त व त्यावरील दर्जाचे अधिकारी : मृत्यू झाल्यास ११ लाख,  
कायमचे अपंगत्व आल्यास ३.६० लाख, जखमी झाल्यास ३.४० लाख रुपये.

राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता भविष्यात अवैध दारू विक्री, निर्मिती, वाहतूक यावर मोठया प्रमाणात कारवाई होणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.