Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षकाला एक लाखाची लाच घेताना अटक

वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षकाला एक लाखाची लाच घेताना अटक

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. दोन पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. या दोघांना एसीबीने ताब्यात घेतलं आहे. एक लाखांची लाच घेताना त्यांना पकडण्यात आले. या घटनेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये आज एसीबीने मोठी कारवाई केली. कुरार पोलिस ठाण्याच्या २ पोलिस अधिकाऱ्यांना लाच घेताना एसीबीने ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी ३ लाखांची लाच मागितली होती. यामधील एक लाख रुपये फिर्यादीकडून घेत असताना त्यांना रंगहाथ पकडण्यात आले. त्यांनी यापूर्वीच दोघांनी फिर्यादीकडून दोन लाख रुपये घेतले होते.

याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजीव तावडे आणि पोलीस उपनिरीक्षक जुने यांना एसीबीने ताब्यात घेतले आहे. या दोघांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या दोन्ही पोलिसांवर आता नेमकी काय कारवाई होते ते पाहणे महत्वाचे ठरेल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.