Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजित पवारांच्या विमान अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होणार

अजित पवारांच्या विमान अपघाताचा खासगी गुप्तहेर संस्थेकडून तपास होणार

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या महिन्यात २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघाताला आज अनेक दिवस पूर्ण झाले असून, त्यासंदर्भात घातपाताचा संशयही व्यक्त केला जात आहे. अशातच आता अजित पवार यांच्या अपघाताचा तपास आता खाजगी गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता आहे.

आमदार रोहित पवार यांनी सरकारी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त करत, हा अपघात नव्हे तर घातपात असल्याची शक्यता यापूर्वीच वर्तवली होती. यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी आता स्वतः खाजगी गुप्तहेर संस्थेकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात, रोहित पवार यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना दोन खाजगी गुप्तहेर संस्थांच्या प्रमुखांची भेट घेतल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

या भेटीदरम्यान त्यांनी अपघाताबाबतची सविस्तर माहिती या संस्थांना दिली. एका गुप्तहेर संस्थेला या अपघाताच्या तपासाचे काम लवकरच दिले जाणार आहे. सरकारी तपास यंत्रणेकडून या तपासात दिरंगाई होण्याची किंवा व्यवस्थित तपास न होण्याची शक्यता रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे, अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दलचे सत्य समोर आणण्यासाठी खाजगी तपास आवश्यक असल्याचे त्यांचे मत आहे.

काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा घटनाक्रम त्यांनी संपूर्ण मांडला होता. मेन पायलट कपूरची चौकशी झाली पाहिजे. ते दारू का पित होते? त्यांना मेंटल ट्रेस होता का? फायनान्शियल कारण होतं का? पैशासाठी त्यांच्यावर दबाव होता का? त्यामुळे त्यांनी अपघात केला का? याची चौकशी झाली पाहिजे. कंपनीच्या व्हॉटसअप ग्रुपची चौकशी झाली पाहिजे. चॅट डीलिट झाल्या तरी ती माहिती मिळते. अॅरो नावाच्या कंपनीच्या चॅटचीही चौकशी केली पाहिजे. हँडलरने ओके का म्हटलं? व्हिजीबिलीटी नसताना टेक ऑफ का झालं आणि लँड का झालं याचीही चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.