पाच हजारांची लाच घेताना महिला पोलीस हवालदाराला अटक
जप्त मोटार सोडण्यासाठी घेतले पैसे
सातारा : खरा पंचनामा
गुन्ह्यात जप्त केलेली मोटार सोडून देण्यासाठी पाच हजारांची लाच मागितल्याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यातील महिला हवालदारावर म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नीता नारायण पळे (रा. क्रांतिसूर्यनगर, म्हसवड, ता. माण) असे महिला पोलिसाचे नाव आहे. याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, म्हसवड पोलिसांनी एका गुन्ह्यात संबंधित तक्रारदाराची मोटार जप्त केली होती. या प्रकरणाचा तपास हवालदार नीता पळे हिच्याकडे होता. गुन्ह्यात जप्त केलेली मोटार सोडून देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली.
याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार केलेल्या पडताळणीत पळे हिने पंचासमक्ष तक्रारदाराकडे लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज दुपारी म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
एसीबीचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील पाटील, हवालदार गणेश ताटे, नीलेश राजपुरे, नवनाथ शिंदे, स्नेहल गुरव यांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक सुप्रिया गावडे तपास करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.