दहावीचा पेपर सुरू असताना शिक्षकांमध्येच राडा; गुरूजी गंभीर जखमी
नागपूर : खरा पंचनामा
राज्यात आजपासून दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरूवात झाली आहे. दहावीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी पेपर सुरू असताना एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकाला बेदम मारल्याचा प्रकार उपराजधानी नागपूरमध्ये घडला आहे. नागपूरमधील किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये या हल्ल्याची घटना घडली आहे. यामध्ये मुख्याध्यापक आणि एक शिक्षक गंभीर जखमी झाला आहेत. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागपूरमधील किदवई हाय हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आज एका शिक्षकावर आणि मुख्याध्यापकावर दुसऱ्या एका शिक्षकाने हल्ला केल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, शाळेत दहावीची परीक्षा सुरू असताना मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये राडा झाला. सगीर अहमद असे जखमी झालेल्या मराठी विषयाच्या शिक्षकाचे नाव आहे. त्यांच्या डोक्यावर गंभीर जखम झाली असून त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सगीर अहमद यांचे बंधू आणि इतर सहकार्यानी आरोप केला आहे की शाळेतील मुख्याध्यापक माजीद खान पठाण आणि एका शिक्षकाने सगीर अहमद यांना त्यांच्या आजच्या उपस्थिती संदर्भात मस्टरवर स्वाक्षरी करण्यास थांबवले. याच मुद्द्यावरून वाद झाले आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाला. यामध्ये सगीर अहमद गंभीर जखमी झाले आहेत. किदवई हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज अल्पसंख्यांक दर्जा असलेली शिक्षण संस्था असून शाळेत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बोगस नियुक्तीचा वाद गेले अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्या वादामुळेच शाळेत शिक्षकांमध्ये दोन गट निर्माण झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.