नमाजाच्या वेळी इस्लामाबाद शहरात भीषण स्फोट, आणीबाणी लागू
इस्लामाबाद : वृत्तसंस्था
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये असलेल्या तरलाई इमाम बारगाह परिसरात झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा स्फोट शहजाद टाउन भागातील इमाम बारगाहमध्ये झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे.
परिस्थिती गंभीर असल्याने संपूर्ण इस्लामाबादमध्ये तात्पुरती आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी इमाम बारगाह आणि आसपासचा परिसर सील केला असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
स्फोटाची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू आहे.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता, इस्लामाबादमधील पॉलिक्लिनिक, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) आणि CDA रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. PIMSच्या कार्यकारी संचालकांच्या आदेशानुसार रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्था कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती अधिकृत प्रवक्त्याने दिल्याचे वृत्त Dawnने दिले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.