Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

संविधानाचे पालन करा अन्यथा भारत सोडा...सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅप अन् मेटाला फटकारलं

संविधानाचे पालन करा अन्यथा भारत सोडा...
सुप्रीम कोर्टाने व्हॉट्सअॅप अन् मेटाला फटकारलं

नवी दिल्ली : खरा पंचनामा

भारताच्या संविधानाचे पालन करा अन्यथा देश सोडा अशा कठोर शब्दांत सुप्रीम कोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि त्याची मूळ कंपनी मेटाला फटकारले आहे.

मंगळवारी (दि.3) सर्वोच्च न्यायालयात व्हॉट्सअॅपच्या 2021 च्या गोपनीयता धोरणाबाबत सुनावणी पार पडली त्यावेळी न्यायालयाने ही भूमिका मांडली आहे. सुनावणीवेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला की, व्हॉट्सअॅपचे गोपनीयता धोरण "शोषणकारी" असून, ते केवळ वापरकर्त्यांचा डेटा शेअर करत नाही तर, व्यावसायिक हेतूंसाठी देखील वापरते. त्यानंतर CJI सूर्यकांत यांनी कठोर शब्दांत जर तुम्ही आमच्या संविधानाचे पालन करू शकत नसाल तर, भारत सोडून जा. आम्ही कोणत्याही नागरिकाच्या गोपनीयतेशी तडजोड होऊ देणार नाही असे सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.