काँग्रेसने २००४ चा बदला घेतला...?
२१ वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती; पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय 'आभार' प्रस्ताव संमत
नवी दिल्ली : खरा पंचनामा
लोकसभेत आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आभार प्रस्ताव संयुक्त संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्रात पास करण्यात आला. मात्र यंदाचा आभार प्रस्ताव हा ऐतिहासिक ठरला. तब्बल २१ वर्षानंतर पंतप्रधानांच्या भाषणाशिवाय हा प्रस्ताव लोकसभेत पास करण्यात आला होता. यापूर्वी २००४ मध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर तत्कालीन पंतप्रधानांना भाषण करता आले नव्हते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणार आभार प्रस्तावावेळी भाषण करणं अपेक्षित होतं. मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत सतत व्यत्यय आणि गोंधळ घाल्यानं लोकसभा अध्यक्षांनी कामकाज तहकूब केलं.
त्यानंतर दोन्ही सभागहांच्या संयक्त सत्रावेळी लोकसभा स्पीकर त्यानंतर दोन्ही सभागृहांच्या संयुक्त सत्रावेळी लोकसभा स्पीकर ओम बिर्ला यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर आवाजी मतदानानं हा प्रस्ताव पारीत करण्यात आला. मात्र यावेळी देखील विरोधी पक्षाचे सदस्य घोषणाबाजी करत होते. यानंतर प्रदर्शन थांबण्याचं नाव घेत नाही हे पाहून स्पीकर ओम बिर्ला यांनी सभागृह दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केलं.
२००४ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भाजपकडून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावेळी भाषण करताना रोखण्यात आलं होतं. आता २०२६ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षांच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करण्यापासून रोखलं आहे.
काँग्रेसचे सचिव जयराम रमेश यांनी याबाबतचा जुना व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. यात मनमोहन सिंग हे २००५ मध्ये सभागृहाला संबोधित करत होते. त्यात मनमोहन सिंग हे २००४ मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर भाषण करू देण्यात आलं नसल्याचा उल्लेख करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.