प्रियकराचा खून करून महिलेने स्वतःच पोलिसांना दिली माहिती
आगशिवनगर येथील घटना
मलकापूर : खरा पंचनामा
डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून महिलेने तिच्या प्रियकराचा खून केला. पहाटे तीनच्या सुमारसस आगाशिवनगर येथील इंगवले वस्ती येथे घटना घडली. खून केल्यानंतर त्याची माहिती संबंधित महिलेनेच पोलिसांना दिली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत महिलेसह मृतदेह ताब्यात घेतला. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. राजेंद्र मरीआप्पा काळे (वय ४५, रा. शिवाजी स्टेडियमच्या पाठीमागे कऱ्हाड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सारिका चंद्रकांत कोळी (वय ४०, रा. इंगवले वस्ती आगाशिवनगर) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.
काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यानंतर सारिका कोळी आगाशिवनगर येथील इंगवले वस्ती येथे चार वर्षांपासून तीन मुलीसह वास्तव्यास आहे. ती गवंड्याच्या हाताखाली काम करत होती. तिला तीन मुली असून दोन मुलींचे विवाह झाले आहेत. एका लहान मुलीसह ती सध्या राहत होती. राजेंद्र काळे आणि सारिका कोळी यांचे प्रेम संबंध होते. राजेंद्र कोळी हा तिच्यावर संशय घेत होता.
मंगळवारी रात्री प्रियकर राजेंद्र काळे हा तिच्या घरी आला. पहाटे त्या दोघांच्या मध्ये भांडण झाले. भांडणाच्या रागात संबंधित महिलेने प्रियकराच्या डोक्यात कुराडीने घाव घालून त्याचा खून केला. खून केल्यानंतर याबाबत स्वतः तिनेच पोलिसात खबर दिली. माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने भेट दिली. घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहासह खून करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब पथकाला पाचारण केले. खून करण्याचे कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.