Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"चाकणकरांचा 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला!"

"चाकणकरांचा 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला!"

मुंबई : खरा पंचनामा 

बलात्कारी भोंदू बाबा अशोक खरातशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला आहे.

चाकणकरांनी महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातला आपलं गुरू मानल्याचे, त्याचे मनोभावे पाय पुसल्याचे आणि डोक्यावर छत्री धरताना आणि त्याची तुलना थेट देवाशी करतानाचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे अशा विकृत माणसाला गुरू मानणाऱ्या चाकणकरांना पक्षात ठेवू नये, अशी मागणी जोर धरू लागली होती.

मात्र, चाकणकरांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्यावर टीकेचा भडिमार सुरूच आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील हा राजीनामा नाही; गच्छंती आहे, असा टोला चाकणकरांना लगावला होता. त्यानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनीही चाकणकर यांच्यावर बोचरी टीका केली आहे.

खडसेंनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं की, 'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला...', असं म्हणत त्यांनी चाकणकरांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे चाकणकरांनी आधी ज्या नेत्यांना आपल्या निशाण्यावर धरलं होतं. तेच आता चाकणकर यांच्यावर तुटून पडल्याचं दिसत आहे. शिवाय खडसे यांनी आपल्या पतीवर केलेल्या आरोपांचा बदला घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

कारण मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पुणे पोलिसांनी रेव्ह पार्टी प्रकरणी रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना अटक केली होती. या प्रकरणी थेट तत्कालीन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत अनेक धक्कादायक दावे केले होते. चाकणकर म्हणाल्या होत्या की, "काही गोष्टी मी बोलू शकत नाही, मला संकोच वाटतो बोलताना तपास देखील सुरू आहे. प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये मुलींच्या चॅटचे काही स्क्रीनशॉर्ट आहेत जे धक्कादायक आहेत.

मुलींचे नग्न फोटो व्हिडीओ यासोबतच काही व्हिडीओंमध्ये खेवलकर हा स्वतः दिसतोय. शिवाय यावेळी त्यांनी या सर्व प्रकारानंतर मला रोहिणी खडसे यांची सहानुभूती वाटते. यामधील सर्व गोष्टी त्यांना माहिती झाल्यावर त्यांच्या मनातील बरेचसे गैरसमज दूर होतील आणि दुसरी बाजू म्हणजे त्यांना जर याबद्दल सर्व माहिती असेल आणि त्याचे समर्थन त्या करत असतील तर गुन्हाचे समर्थन करणारही गुन्हेगार असतो. तर ते दुर्लक्ष करण्यासारखे नाही, असेही त्यांनी म्हटले होते." त्यामुळे चाकणकरांनी खडसेंना घेरण्याची एकही संधी त्यावेळी सोडली नव्हती त्यामुळे आता खडसे यांनी वचवा काढल्याचं बोललं जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.