देशातली 4 विमानतळं राहणार बंद!
दिल्ली : खरा पंचनामा
तुम्ही पुढच्या काही महिन्यात विमानाने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर त्याआधी समोर आलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्या. कारण येणाऱ्या काळात भारतातील एकूण चार विमानतळं काही काळासाठी बंद राहणार आहेत.
या वर्षी रनवे रिपेअर करण्यासाठी हे चार विमानतळ काही काळासाठी तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये जोधूपूर विमानतळ, श्रीनगर विमानतळ, पुणे विमानतळ, अहदमपूर एअर बेस यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जोधपूर विमानतळ येत्या 29 मार्च ते 27 एप्रिल या काळात साधारण एका महिन्यासाठी बंद असेल. या विमानतळावरून कोणतेही विमानोड्डाण होणार नाही. हीच बाब लक्षात घेऊन इंडिगो, एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस या प्रवासी विमान वाहतूक कंपन्यांनी 28 मार्चनंतरच्या विमान प्रवासासाठीचे तिकीट बुकिंग अगोदरच थांबवले आहे. दुसरीकडे श्रीनगर विमानतळावरील काही फ्लाईट्स या ऑगस्टपासून ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत वीकएंडपर्यंत चालू असतील. त्यानंतर 16 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत हे विमानळ पूर्णपणे बंद असेल.
दुसरीकडे पुण्याच्या विमानतळावरील रनवेची डागडुगी करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. परंतु ही डागडुजी नेमकी कधी होईल, याची नेमकी तारीख समोर आलेली नाही. तर आदमूपर एअरबेस या वर्षाच्या शेवटी साधारण आठ महिन्यांसाठी बंद राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही विमानतळे सीमाभागात असल्याने लष्करासाठी खूप महत्त्वाची आहेत. या विमानतळांवरील रनवेवर फायटर जेट तसेच अन्य संरक्षणविषयक उड्डाणे होतात. सैन्याच्या विमानांच्या उड्डाणासाठी तेथील रनवे अनुकूल असणे गरजेचे असते. त्यामुळेच या विमानतळांच्या रनवेची डागडुजी वेळेवर केली जाते. या काळात विमानांचे मार्ग बदलले जातात. विमान प्रवासा उशिराने होतो. त्यामुळेच आगामी काही दिवसांत तुम्ही विमानाने प्रवास करत असाल तर या अपडेट लक्षात ठेवूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.