Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इराणने दुबई एअरपोर्ट, बुर्ज खलिफा, अबूधाबी, बहरीन सगळीकडे सोडल्या मिसाईल

इराणने दुबई एअरपोर्ट, बुर्ज खलिफा, अबूधाबी, बहरीन सगळीकडे सोडल्या मिसाईल

दिल्ली : वृत्तसंस्था 

शनिवारी सकाळी इस्त्रायलने lइराणवर हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली. इस्त्रायलनंतर अमेरिकेनं देखील इराणवर हल्ला केला असून नव्या युद्धाला तोंड फुटलं आहे.

दोन्ही देशांनी एकाच वेळी हल्ला केल्यानंतर इराण देखील चवथाळलं आहे. अमेरिका-इस्त्रायलचं सैनिकी स्थळ असलेल्या तब्बल सात देशांवर इराणने हल्ला चढवला आहे.
इस्रायल आणि अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण जवळपास एक तासभर स्तब्ध राहिला. लगेच प्रत्युत्तर दिलं नाही. मात्र तासाभरात इराणच्या सैन्याने सात पश्चिम आशियाई देशांवर हल्ला करून प्रत्युत्तर दिलं. इराणने सात देशांमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर हे हल्ले केले. इराणने एकाच वेळी सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत, कतार, जॉर्डन आणि इराकवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला केला.
इराणने बहरीनमधील अमेरिकेच्या पाचव्या फ्लीट मुख्यालयावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. मनामामध्ये धूर आणि स्फोट दिसून आले.
युएई: अबू धाबी आणि अल धफ्रा तळांवर हल्ले.
कतारः अल उदेद हवाई तळावर लक्ष्य.
कुवेतः अली अल सलेम तळावर क्षेपणास्त्र हल्ला.
जॉर्डनः दोन क्षेपणास्त्रे रोखण्यात आली.
सौदी अरेबियाः रियाधमध्ये स्फोटांची नोंद झाली.

इराणने डझनभर बॅलिस्टिक, सुपरसॉनिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये इस्रायल, अबू धाबी आणि दुबई, सौदी अरेबियाची राजधानी रियाध, दोहा, बहरीनची राजधानी मनामा आणि कुवेत, जॉर्डन आणि इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्याचा युएईवर व्यापक परिणाम झाला. दुबईमध्ये दिवसभर सतत स्फोट होत राहिले. जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा इमारतीजवळ देखील स्फोट पाहायला मिळाले आहेत. तसेच युएईने अनेक क्षेपणास्त्रे रोखल्याचा दावा केला. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्येही सतत स्फोट होत होते.

बहरीनमध्ये तैनात असलेल्या अमेरिकन सैन्याच्या फिफ्थ फ्लीटला सर्वाधिक फटका बसला. हल्ल्यानंतर तेथे मोठी आग लागली. कतारमध्येही स्फोट झाले, इराणच्या आयआरजीसीने याला "शक्तिशाली हल्ला" म्हटलं आहे.

मध्य पूर्वेतील युद्धादरम्यान, भारताने इस्रायल आणि इराणमधील आपल्या नागरिकांना "अत्यंत सावधगिरी" बाळगण्याचा आणि नियुक्त केलेल्या आश्रयस्थानांजवळ राहण्याचा सल्ला दिला आहे. अंदाजे ९.७ दशलक्ष भारतीय नागरिक मध्य पूर्वेत राहतात आणि काम करतात.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.