नितीश कुमार मुख्यमंत्रीपद सोडून राज्यसभेत जाणार!
पटना : खरा पंचनामा
बिहारच्या राजकारणात एक मोठा भूकंप झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलंय की ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असून आता राज्यसभेत जाण्याची तयारी करत आहेत. जवळपास दोन दशकं बिहारच्या सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर त्यांचा हा निर्णय राज्यातील राजकारणात मोठ्या बदलाचे संकेत देत आहे.
नितीश कुमार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टद्वारे आपल्या निर्णयाची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, राजकारणात आल्यापासून त्यांच्या मनात एक विशेष इच्छा होती. त्यांना संसदेची दोन्ही सभागृहं (लोकसभा आणि राज्यसभा) आणि राज्याच्या विधानमंडळाची दोन्ही सभागृहं (विधानसभा आणि विधान परिषद) अशा चारही सभागृहांचा सदस्य होण्याची संधी मिळावी, असं त्यांना वाटत होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.