लोकसभेतील फक्त 'हे' दोनच खासदार घेत नाहीत पगार!
नवी दिल्ली : खरा पंचनामा
खासदारांना मिळाणार पगार आणि भत्ते हा विषय अनेकदा चर्चेत असतो. या पगाराच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या पक्षांमधील खासदार अनेकदा पक्षाभेद विसरून एकत्र येताना देखील पाहायला मिळतात. मात्र याला काही अपवाद देखील आहेत. इंडिया टुडेने माहितीच्या अधिकारांतर्गत मिळवलेल्या माहितीमधून एक खास गोष्ट समोर आली आहे. सध्याच्या लोकसभेतील फक्त दोन असे खासदार आहेत ज्यांनी त्यांचा पगार न घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक भाजपा आणि दुसरा खासदार काँग्रेसचा आहे.
हे दोन्ही खासदार कुरुक्षेत्र ते इंफाळ या २५७५ किलोमीटर अंतर असलेल्या दोन वेगवेगळ्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. मात्र, या दोघांपैकी एकाने तर तर याच्याही पुढे मजल मारली आहे, त्यांनी फक्त पगारच नाही, तर खासदार म्हणून मिळणारे सरकारी भत्ते आणि सोयी-सुविधा देखील न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभा सेक्रेटरीएटकडून आरटीआय अंतर्गत मिळालेल्या उत्तरात सांगण्यात आले आहे की, हे दोन खासदार म्हणजे कुरूक्षेत्रचे खासदार नवीन जिंदाल आणि इनर मणिपूरचे खासदार डॉ. बिमोल अकोइजाम अंगोमचा हे आहेत.
त्यांच्या निवडणूक प्रतिक्षापत्रानुसार, दोन्ही खासदारांची खूपच वेगळ्या स्वरूपाची आर्थिक पार्श्वभूमी राहिली आहे. कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदाल यांनी प्रतिज्ञापत्रात १२४१ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे, तर डॉ. बिमोल अकोइजाम अंगोमचा यांनी सुमारे ९७ लाख रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.
जिंदाल यांचा पगार न घेण्याचा निर्णय लक्षात येऊ शकतो, कारण ते लोकसभेतील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत. पण तरीही ते सर्वात श्रीमंत खासदार नाहीत. हा मान गुंटूरचे खासदार डॉ. चंद्रशेखर पेम्मासाणी (टीडीपी) यांच्याकडे आहे, ज्यांनी ५७०५ कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता जाहीर केली आहे. ही संपत्ती जिंदाल यांच्या मालमत्तेच्या चौपट आहे. त्यांच्यापाठोपाठ चेवेल्लाचे खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी (भाजपा) यांचा क्रमांक लागतो, ज्यांची संपत्ती ४५६८ कोटी रुपयांहून अधिक आहे.
आरटीआय अंतर्गत देण्यात आलेल्या उत्तरामधून संसदेतील एक वेगळे चित्र पाहायला मिळते. या उत्तरानुसार लोकसभेचे सध्याचे विद्यमान ४८१ सदस्य पगार घेतात.
लोकसभेत एकूण ५४३ जागा आहेत, ज्यापैकी सध्या दोन जागा रिक्त आहेत. मात्र, ज्यांची नावे पगार घेणाऱ्यांच्या यादीत नाहीत त्या उरलेल्या खासदारांची स्थिती या आरटीआयला देण्यात आलेल्या उत्तरात स्पष्ट करण्यात आलेली नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.