Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडाबीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला

जयराम चाटे तुरुंगातून बाहेर पडण्यापूर्वी गँगचा राडा
बीडमध्ये तरुणावर लोखंडी रॉड, कत्तीने हल्ला

बीड : खरा पंचनामा 

बीडच्या केज तालुक्यातील तांबवा परिसरात गुरुवारी पाच जणांनी संग्राम चाटे नामक तरुणाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचे नाव घेत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मारहाण करणारे हे जयराम चाटे आणि कृष्णा आंधळे यांच्या टोळीतील असल्याची चर्चा आहे. पोलीस या सगळ्यांचा शोध घेत आहेत.

'तुमचा बाप जयराम चाटे उद्या येतोय', 'आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो', असे म्हणत हल्ला केला. यामध्ये तरूण संग्राम चाटे गंभीररीत्या जखमी झाला असुन केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी केज पोलिसात पाच आरोपींच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याच्या भावाचे निधन झाल्याने अंत्यविधींसाठी त्याला काल तुरुंगाबाहेर सोडण्यात आले होते. यामुळे बीडमधील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची भीती निर्माण करण्यात आली होती. तसाच प्रकार तांबवा परिसरात घडल्याने आता पोलीस काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जयराम चाटेच्या भावाचे 2 मार्च रोजी निधन झाले होते. त्यानंतर केल्या जाणाऱ्या बाराव्याच्या विधीसाठी जयराम चाटे याला उपस्थित राहता यावे यासाठी त्याच्या वकिलांनी न्यायालयात अर्ज केला होता. याच अर्जावर अटी शर्ती घालत न्यायालयाने जयराम चाटेला 12 व्याच्या विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी या अर्जाला विरोध दर्शवला होता. मात्र सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने आरोपी जयराम चाटेला सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पोलीस बंदोबस्तात धार्मिक विधीस उपस्थित राहण्याची परवानगी दिली. त्यानुसार शुक्रवारी बीड जिल्हा कारागृहातून जयराम चाटे पोलीस बंदोबस्तात बाहेर पडला आणि त्याच्या मूळ तांबवा या गावी चाटेच्या भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी उपस्थित राहिला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.