Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रंकाळ्याच्या साक्षीने कर्मचारी अधिकाऱ्यात फ्री स्टाईल!प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु

रंकाळ्याच्या साक्षीने कर्मचारी अधिकाऱ्यात फ्री स्टाईल!
प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु 

कोल्हापूर : खरा पंचनामा 

रम्य रंकाळ्याच्या सानिध्यात असलेल्या एका कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची चर्चा आहे. रंकाळा आणि त्या विभागातील काही अधिकाऱ्यांच्या साक्षीने त्या कार्यालयाच्या गेट बाहेर ही घटना चार ते पाच दिवसापूर्वी घडल्याचे सांगितले जात आहे. पण या घटनेची चर्चा पाच जिल्ह्यात सुरु आहे.

रंकाळ्याजवळ जिल्ह्याचे घटक प्रमुख आणि पाच जिल्ह्याच्या घटक प्रमुखाचे कार्यालय आहे. चार ते पाच दिवसापूर्वी संबंधित विभागातील एक कर्मचारी आणि दुय्यम दर्जाचा अधिकारी यांच्यात कार्यालयाच्या गेटवरच कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. त्यावेळी तेथे वाद घालणाऱ्या दोघांशिवाय अन्य दोन अधिकारी दर्जाचे लोक उपस्थित होते. वाद झाल्यावर त्यांनी तो मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र वाद वाढतच गेला. 

त्यानंतर रंकाळा आणि ते दोन अधिकारी दर्जाच्या लोकांसमोर त्यांच्यात फ्री स्टाईल हाणामारी झाली. यात कर्मचाऱ्याने त्या दुय्यम दर्जाच्या व्यक्तीला चांगलेच बुकल्याची चर्चा आहे. हे प्रकरण नंतर घटक प्रमुखांपर्यंत गेल्याचेही समजते. या हाणामारीची पोलिसांत कसलीच नोंद नाही.

एकंदरीत जिल्ह्याचे आणि पाच जिल्ह्याचे घटक प्रमुख यांच्या कार्यालयाबाहेर झालेल्या या घटनेची केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर पाच जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.