Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अशोक खरात प्रकरणी सुनेत्रा पवारांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

अशोक खरात प्रकरणी सुनेत्रा पवारांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

नाशिक : खरा पंचनामा 

नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. स्वयंघोषित अशोक खरात हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना अशोक खरात याच्याशी जवळचे संबंध असल्यामुळे राजीनामा द्यावा लागला होता. अशोक खरातला त्यांनी गुरु मानलं होतं. आता याच रुपाली चाकणकर यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद आहे. मात्र, आता या पदावरुनही रुपाली चाकणकर यांची उचलबांगडी होण्याची दाट शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अचानक देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे कारण आणि इतर तपशील अद्याप समोर आला नसला तरी या बैठकीत अशोक खरात प्रकरणाबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांची बैठक झाली होती. या बैठकीत रुपाली चाकणकर यांच्या अशोक खरातशी असलेल्या संबंधांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होणारी बदनामी कशी थांबवायची, याबाबत तिन्ही नेत्यांची चर्चा झाली होती. या बैठकीतून रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची सूचना दिल्याचीही कुजबुज राजकीय वर्तुळात होती. या बैठकीनंतर सुनील तटकरे यांनी, 'कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही', असे सूचक वक्तव्य केले होते. तेव्हापासूनच रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरुन उचलबांगडी होईल, अशी चर्चा रंगली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.