Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस, पाच जिल्ह्यांना अलर्ट

सोसाट्याचा वाऱ्यासह गाराचा पाऊस, पाच जिल्ह्यांना अलर्ट

मुंबई : खरा पंचनामा 

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे.

विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, उत्तर भारतात आलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. मागच्या ४८ तासांत पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत आणि विदर्भमराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पावसानं अतोनात नुकसान झालं आहे.

हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, २० आणि २१ मार्च हे दोन दिवस पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या सरी बरसतील. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील भागांतही पावसाची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यात सायंकाळच्या सुमारास ढगाळ हवामान आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.

सध्या उत्तर भारतात जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या परिसरात एक शक्तिशाली वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. त्याचा प्रभाव थेट मध्य भारतापर्यंत जाणवत असून, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण तयार झाले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.