Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उद्यापासून ४ दिवस अंबाबाईचे दर्शन बंद मंदिराच्या गाभाऱ्याचे संवर्धन

उद्यापासून ४ दिवस अंबाबाईचे दर्शन बंद 
मंदिराच्या गाभाऱ्याचे संवर्धन

पूजा फडके 
कोल्हापूर : खरा पंचनामा 

ऐतिहासिक करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या जतन आणि संवर्धनाचे काम सध्या वेगात सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मुख्य गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शनिवार, १४ मार्च ते मंगळवार, १७ मार्च २०२६ पर्यंत गाभारा दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली हे काम होणार असून, या काळात देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. मात्र, भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाने उत्सव मूर्ती आणि तत्व कलशाच्या दर्शनाची सोय केली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने स्पष्ट केले आहे की, मंदिरातील सर्व नित्य धार्मिक विधी आणि पूजा परंपरेनुसार सुरू राहतील. १८ मार्चपासून भाविकांना पुन्हा नेहमीप्रमाणे मूळ मूर्तीचे दर्शन घेता येईल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.