Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बाबा सिद्दिकी हत्येशी बिल्डर लॉबीचा संबंध नाहीमुंबई पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती

बाबा सिद्दिकी हत्येशी बिल्डर लॉबीचा संबंध नाही
मुंबई पोलिसांची उच्च न्यायालयात माहिती

मुंबई : खरा पंचनामा 

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकींच्या हत्येमागे बिल्डर लॉबीचा सहभाग किंवा कोणताही संबंध नाही, हा आरोप कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय केवळ संशय आणि अनुमानांवर आधारित आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.

बांधकाम व्यावसायिकाचा बाबा सिद्दीकी हत्येशी संबंध असल्याचे पुरावे सापडले नाहीत. ही हत्या अनमोल बिश्नोईच्या नेतृत्वाखालील संघटित गुन्हेगारी सिंडिकेटने दहशत निर्माण करण्यासाठी आणि वर्चस्व आणि आर्थिक लाभ मिळविण्यासाठी केली होती, असे तपासाअंती सिद्ध झाल्याचे साहाय्यक पोलिस आयुक्त (गुन्हे) किशोरकुमार शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

तसेच अनमोल बिश्नोईला अमेरिकेतून प्रत्यर्पण करण्यास भाग पाडणे, हे तपास अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्ये कायद्याच्या अधीन राहून सातत्याने व प्रामाणिकपणे पार पाडल्याचे द्योतक आहे, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यामुळे सिद्दीकी यांच्या पत्नीचे पोलिसांविरुद्ध आरोप वस्तुतः चुकीचे, बिनबुडाचे आणि पोलिस यंत्रणेची प्रतिमा खराब करण्याच्या गुप्त हेतूने केल्याचा दावाही प्रतिज्ञापत्रातून पोलिसांनी केला.

वांद्रे पूर्व येथे तीन हल्लेखोरांनी १२ ऑक्टोबर २०२४च्या रात्री बाबा सिद्दिकींची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणातील खऱ्या गुन्हेगारांना अटक करण्यास टाळाटाळ केली असून, पतीच्या मृत्यूमागे बिल्डर लॉबी आणि एका राजकीय नेत्याचा सहभाग असल्याचा संशय सिद्दिकीच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांनी वकील त्रिवनकुमार कर्णानी यांच्यामार्फत याचिकेत केला. बाबा सिद्दीकी नेहमीच झोपडपट्टीवासीयांच्या हितासाठी झटत होते. म्हणूनच अनेक विकासक आणि बांधकाम व्यावसायिकांसाठी ते अडथळा ठरत होते. तरीही पोलिसांनी या दृष्टिकोनातून तपास केला नाही. संशयित गुन्हेगारांचे सध्याच्या सत्ताधारी राज्य सरकारशी संबंध आहेत. म्हणून तपास संस्थेद्वारे चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.