Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एनसीईआटीचे आठवीचे पुस्तक रद्द ! परिषदेने व्यक्त केली दिलगिरी

एनसीईआटीचे आठवीचे पुस्तक रद्द ! परिषदेने व्यक्त केली दिलगिरी

नवी दिल्ली : खरा पंचनामा 

आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील न्यायव्यवस्थेशी संबंधित प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने बिनशर्त बिनशर्त माफी मागितली असून संपूर्ण पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

संस्थेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात सांगितले की इयत्ता आठवीसाठी प्रकाशित करण्यात आलेल्या 'एक्सप्लोरिंग सोसायटी: इंडिया अँड बियॉन्ड' या सामाजिक शास्त्राच्या पुस्तकात 'आपल्या समाजातील न्यायव्यवस्थेची भूमिका' या विषयावर चौथे प्रकरण समाविष्ट करण्यात आले होते. या प्रकरणातील मजकुराबाबत वाद निर्माण झाल्यानंतर संस्थेचे संचालक आणि सदस्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून संपूर्ण पुस्तक उपलब्धतेतून काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

संस्थेने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की या प्रकरणामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल आम्हाला खेद आहे. शैक्षणिक साहित्य तयार करताना अचूकता, संवेदनशीलता आणि जबाबदारीची सर्वोच्च पातळी राखण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व संबंधित घटकांनी दाखवलेल्या समजुतीबद्दलही संस्थेने आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, या प्रकरणावर सुनावणी करताना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनंतर या पाठ्यपुस्तकाबाबत विशेष सूचना जारी करण्यात आल्या होत्या. ज्यांच्याकडे हे पुस्तक आहे त्यांनी ते संस्थेच्या मुख्यालयात परत करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणातील मजकुराशी संबंधित माहिती सामाजिक माध्यमे किंवा इतर डिजिटल माध्यमांवर प्रसारित केली असल्यास ती तातडीने हटवण्यासही सांगण्यात आले आहे.

या वादानंतर केंद्रातील केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेमाहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयांना पत्र पाठवून या वादग्रस्त पुस्तकाचे डिजिटल माध्यमांवर प्रसारण थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर हे पुस्तक प्रसारित होऊ नये यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे सांगण्यात आले आहे. संस्थेने स्पष्ट केले आहे की 'एक्सप्लोरिंग सोसायटीः इंडिया अँड बियॉन्ड' या पुस्तकाची प्रत ज्या व्यक्ती किंवा संस्थांकडे असेल त्यांनी ती परत करावी. तसेच 'आपल्या समाजातील न्यायव्यवस्थेची भूमिका' या प्रकरणाशी संबंधित कोणतीही सामग्री इंटरनेट किंवा सामाजिक माध्यमांवर उपलब्ध असल्यास ती शक्य तितक्या लवकर काढून टाकावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.