काँग्रेसच्या ८ आमदारांना ५ कोटींची ऑफर, पाच जण अटकेत
बेंगळुरू : खरा पंचनामा
देशातील काही राज्यांमध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. मात्र, त्याआधीच कर्नाटकमध्ये धक्कादायक घडामोडी घडल्या. ओडिशामधील राज्यसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
काँग्रेसच्या ८ आमदारांना भाजपच्या बाजूने मतदान करण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांची लाच दिल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी एका हॉटेलमधून पाच जणांना अटक केली असून, कथित 'ऑपरेशन लोटस'च्या या प्रयत्नामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
आज १६ मार्च रोजी राज्यसभेसाठी ओडिशात मतदान होत आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी ओडिशातील काँग्रेसच्या १४ पैकी ८ आमदारांना बेंगळुरू येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आरोप केला की, चार ते पाच लोकांनी या हॉटेलमध्ये घुसून काँग्रेस आमदारांना ५ कोटी रुपयांची ऑफर दिली आणि क्रॉस व्होटिंगसाठी दबाव टाकला. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना बेड्या ठोकल्या.
कोरापुटचे खासदार सप्तगिरी शंकर उलाका यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी ओडिशाच्या राउरकेला येथील आहेत. त्यांच्याकडे कोरे चेक (Blank Checks) सापडले असून, चौकशीत त्यांनी भाजप समर्थित अपक्ष उमेदवार दिलीप राय यांचे नाव घेतल्याचे समजते. ज्या हॉटेलमध्ये हे आमदार थांबले होते, ते हॉटेलदेखील दिलीप राय यांच्या मालकीचे असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.