विशेष चर्चेत सत्ताधाऱ्यांनाच स्वारस्य नाही
अजितदादांच्या आमदाराचा घरचा आहेर
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होत आहे. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील दुसरा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्द्यांवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आक्रमक होताना दिसत आहे.
मात्र विशेष चर्चेत विधान परिषदेतील सदस्यांना स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे. कारण पाच दिवसांपूर्वीच (05 मार्च) विधान परिषदेत सकाळी 10 वाजता अर्धा तास चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मंत्री अनुपस्थित असल्याने सुरुवातील दोन वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. मात्र त्यानंतरही मंत्री अनुपस्थित नसल्याने नीलम गोऱ्ह यांनी सभागृहाचे कामकाज थांबवले होते. त्यामुळे अर्धा तास होऊ शकली नव्हती. त्यानंतर आज (10 मार्च) सुद्धा विधान परिषदेत सकाळी 10 वाजता अर्धा तास चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र सदस्य उपस्थित नसल्याने 15 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते.
विधान परिषदेच्या कामकाजाला 10 वाजता सुरुवात झाली, त्यावेळी सत्ताधारी आमदार म्हणजे अजित पवार गटाचे आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात सदस्य नसल्याने आपली नाराजी बोलून दाखवली. त्यांनी म्हटले की, सभागृहामध्ये आपण महत्त्वाची चर्चा करत आहोत. पण सभागृहात मंत्री आणि सदस्य एकटेच बसले आहेत. त्यामुळे सचिवांनी तालिका अध्यक्ष सुनील शिंदे यांना मार्गदर्शन करावे, अशी सूचना विक्रम काळे यांनी केली. त्यानंतर सचिवांसोबत चर्चा केल्यानंतर सुनील शिंदे यांनी 15 मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. मात्र 15 मिनिटांनंतरही सभागृहात कोणीच आले नव्हते. त्यामुळे विक्रम काळे यांनी पुन्हा एकदा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली.
विक्रम काळे म्हणाले की, सभागृह आपण नियमानुसार चालवतो. सभागृहात सदस्य उपस्थित नाही म्हणून 15 मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले होते. त्यामुळे ही गंभीर बाब आपण विचारत घेतली पाहिजे, अशी विनंती त्यांनी केली. मात्र तालिका अध्यक्ष सुनील शिंदे यांनी म्हटले की, आपण माझ्या आधी आलेले आहात. त्यामुळे मी एवढीच विनंती करेल की, आपण आपली नाराजी मागे घ्यावी आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत सुरू राहू द्यावे. मात्र यानंतर सचिन अहिर यांनीही म्हटले की, आपण विशेष बैठक घेतली आहे, पण आपण म्हटल्याप्रमाणे सभागृहात सदस्य उपस्थित नसणे या गोष्टीला मुभा द्यावी लागेल. परंतु सत्ताधारी बाकावर मंत्र्यांची उपस्थिती असणे ही सरकारची जबाबदारी आहे. ही जबाबदारी टाळून चालणार नाही. सत्ताधारी आमदारच (विक्रम काळे) बोलत असतील की, सदस्य उपस्थित नाही, तर ही गंभीर बाब आहे. सभागृहात सदस्य उपस्थित नसल्याबद्दल मी बोलू का? असे म्हणते सचिन अहिर यांनी सत्ताधाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.