Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भास्कर जाधव अन् सचिन कल्याणशेट्टींमध्ये जोरदार राडा विधानभवनच्या पोर्चमध्ये एकमेकांच्या वडिलांचा उद्धार

भास्कर जाधव अन् सचिन कल्याणशेट्टींमध्ये जोरदार राडा 
विधानभवनच्या पोर्चमध्ये एकमेकांच्या वडिलांचा उद्धार

मुंबई : खरा पंचनामा 

विधानसभेत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच आज बुधवारी (ता.04) विधानसभेच्या पोर्चमध्ये दोन आमदार एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना घडली. या दोन्ही आमदारांनी थेट एकमेकांचा बाप काढला असून याबाबतचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यामध्ये ही शाब्दिक बाचाबाची झाली आहे. यावेळी दोन्ही आमदारांनी एकमेकांच्या बापाचा उल्लेख केला. मिळालेल्या माहितीनुसार, विधान भवनातील सभागृहात प्रवेश करण्याआधी जी सही करावी लागते. त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. तर इथेच सही करण्यावरून या दोन्ही आमदारांमध्ये शाब्दीक चकमक झाली.

याबाबतचा व्हिडिओ आता समोर आला आहे. ज्यामध्ये भाजपचे अक्कलकोटचे आमदार भास्कर जाधव यांना, "बाप कशाला काढायला लागलाय, तुम्हाला बाप काढायचा अधिकार आहे का?" असं म्हणताना दिसत आहेत. त्यावर भास्कर जाधव, 'हो, आहे' असं म्हणतायत.

त्यावर कल्याण शेट्टी, "तुम्ही माझा बाप काढला तर तुमचा बाप काढणार. बाप काढायला नको होता", असं म्हणतात. त्यावर "तुम्हाला माझा काढायचा असेल तर काढा", असं भास्कर जाधव म्हणत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतय.

दरम्यान, हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून आमदारांच्या भाषेवर आणि वर्तवणुकीवर नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत. याआधीही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यात विधान भवनात वाद झाला होता. त्यानंतर आता आणखी दोन आमदार एकमेकांना भिडल्याने आमदारांना राज्याच्या विधान भवनात कसं वागावं याचं प्रशिक्षण देण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.