Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमेरिका-इराण युद्धाला ब्रेक!

अमेरिका-इराण युद्धाला ब्रेक!
दिल्ली : वृत्तसंस्था 

इराणसोबत सुरू असलेलं युद्ध थांबवण्यासाठी आता अमेरिकेनं एक पाऊल मागे घेतलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय की इराण आणि अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी शस्त्रसंधीबाबत गेल्या दोन दिवसात चर्चा केलीय.

यामुळे पुढच्या पाच दिवसात अमेरिकेकडून इराणच्या कोणत्याही ऊर्जा ठिकाणांवर हल्ले केले जाणार नाहीत. अमेरिकेच्या या निर्णयामुळे युद्ध थांबण्याच्या दिशेनं सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचं म्हटलं जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, इराणसोबत गेल्या दोन दिवसांपासू न सकारात्मक अशी चर्चा झाली. याचा उद्देश मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा काढणं हा आहे. दोन्ही देशांनी या चर्चेकडं सकारात्मक पद्धतीने पाहिलंय. आठवडाभर ही चर्चा सुरू राहील. मी अमेरिकेच्या संरक्षण विभागाला आदेश दिलेत की इराणच्या पॉवर प्लांट आणि ऊर्जा प्रकल्पांवर पुढचे पाच दिवस हल्ले टाळण्यात यावेत.

हल्ले थांबवण्याचा निर्णय हा इराणसोबत पुढच्या चर्चेत काय घडलतं त्यावर अवलंबून आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. ट्रम्प यांनी रविवारी इशारा दिला होता की जर ४८ तासात इराणने होर्मुझची वाहतूक पूर्ववत केली नाही तर पॉवर प्लांट आणि ऊर्जा प्रकल्प उद्ध्वस्त केले जातील. दरम्यान, आता दोन्ही देशांकडून शांततेसाठी हालचाली सुरू झाल्यानं जगभरातून सुटकेचा निश्वास टाकला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात महागाई भडकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. इराणने ट्रम्प यांच्या इशाऱ्यावर कठोर प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, आमच्या पायाभूत सुविधांवर हल्ल्याचे परिणाम आखाती देशांना भोगावे लागतील. जर आमच्या वीज प्रकल्पांना टार्गेक टेलं तर आम्ही आखाती देशातील महत्त्वाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ले करू असा इशाराही इराणने दिला होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.