Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सोसायटीची लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू; चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा

सोसायटीची लिफ्ट कोसळून तरुणाचा मृत्यू; चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा

पिंपरी : खरा पंचनामा 

तळेगाव दाभाडे येथील एका गृहनिर्माण संस्थेची लिफ्ट अचानक खाली कोसळल्याने एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत सोसायटीच्या चेअरमनसह ११ सदस्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनेश सुरंगे असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांच्या भावाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीचे चेअरमनसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ दिनेश सुरंगे लिफ्टने खाली जात असताना लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अडकली. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना लिफ्टचा रोप (दोरी) तुटल्याने लिफ्ट थेट खाली कोसळली. या भीषण अपघातात दिनेश गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेला सोसायटीच्या कमिटीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.