Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोर्टाच्या दणक्याने अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

कोर्टाच्या दणक्याने अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

नवी मुंबई : खरा पंचनामा 

नवी मुंबईतील सीबीडी येथे राहणारे गुरुनाथ चिचकर आत्महत्या प्रकरणी घटनेच्या ११ महिन्या नंतर अमली पदार्थ विरोधी पथकाच्या तीन अधिकाऱ्यांच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुरुनाथ चिचकर यांचे दोन्ही मुलांची नावे हायड्रा गांजा प्रकरणी आंतरराष्ट्रीय रॅकेट मध्ये आल्याने गुरुनाथ यांची चौकशी सुरु होती. या चौकशी ससेमिऱ्याला कंटाळून त्यांनी २४ एप्रिल २०२५ ला सकाळी राहत्या घरी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती.

नवी मुंबईतील सीबीडी येथे राहणारे गुरुनाथ चिचकर यांचा प्रवास माथाडी कामगार ते राजकीय नेते आणि विकासक असा झाला होता. राजकीय नेत्यात चांगली उठबैस असणाऱ्या चिचकर यांची धीरज आणि नवीन हे दोन्ही मुले विदेशात राहून हायड्रा गांजाचे रॅकेट चालवत होते. त्यांची स्वतःची टोळी असून त्या द्वारे आशियातील देशात हायड्रा गांजाची तस्करी करून त्यांनी मोठी माया जमवली होती असा आरोपी पोलिसांनी केला होता. या प्रकरणी खात्री झाल्यावर त्यांचे वडील गुरुनाथ चिचकर यांच्या मागे अमली पदार्थ विरोधी पथकाचा ससेमिरा लागला. याला कंटाळून त्यांनी २४ एप्रिल २०२५ ला राहत्या घराच्या तळमजल्यावर एकटे असताना डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली होती.

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली होती. त्यानुसार " सकाळची वेळ आहे मला एनसीबी ने बोलावले आहे आता सहन होत नाही. मी हे कृत्य केले असते तर सहन केले असते अशा आशयाचे लिहले असून आईची माफी मागितली होती तसेच त्रास ज्या अधिकाऱ्यांच्या मुळे झाला त्यांची नावे लिहली होती. त्यामुळे त्यांच्या पत्नीने या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मात्र गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता. या प्रकरणी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या प्रकरणी न्यायालयाने गुन्हा नोंद करण्याचा आदेश देताच एनआरआय पोलीस ठाण्यात अमित धावटे, संदीप निगडे, आणि आकाश मलिक या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचकर यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार दहा पंधरा अधिकाऱ्यांची अचानक घरी येणे कामगारांना दरडावणे, मोबाईल हिसकावून घेणे बँक स्टेटमेंट मागणी करणे, पोलीस ठाण्यात चौकशीच्या नावाखाली दिवसभर बसवून ठेवणे, पैशांची मागणी करणे आदी कारणांना त्रासून पती गुरुनाथ यांनी आत्महत्या केली असून त्यांच्या आत्महत्येस कारण असणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती.

हायड्रा गांजा तस्करी प्रकरणी त्यांची दोन्ही मुले नवीन आणि धीरज हे सध्या न्यायालयीन कोठडीत असून या प्रकरणी तपास सुरु आहे. याच गुन्ह्यात आता पर्यंत दहा पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली असून त्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.