Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"खरात प्रकरणाची निःपक्षपणे चौकशी सुरु"६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते उदघाटन

"खरात प्रकरणाची निःपक्षपणे चौकशी सुरु"
६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते उदघाटन 

नागपूर : खरा पंचनामा 

अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांना काय समज देण्यात आली, याबाबत माझ्याकडे सध्या कोणतीही माहिती नाही. या प्रकरणाची निःपक्षपणे चौकशी सुरू आहे. दररोज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे रोखठोकपणे सांगितले.

६९ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे रविवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली. खरात प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रकरणात सध्याची स्थिती काय आहे, हेही मला माहित नाही. जी काही चौकशी सुरू आहे, ती निःपक्षपणे होत आहे. आवश्यकता असेल तेंव्हाच माहिती घेतो. त्यामुळे योग्य वेळी त्योग्य माहिती दिली जाईल.

पेट्रोल तुटवड्याबाबत कोणीही अफवा पसरवू नये. जेव्हा लोकांनी रांगा लावल्या होत्या, तेव्हाही सरकारने स्पष्ट भूमिका मांडली होती. इंधनाचा आपल्याकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीही काही लोक अफवा पसरवत होते. आता अशा अफवा पसरवणाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता पसरवणाऱ्यांवर आम्ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता रांगा लागणार नाहीत, असे मला वाटते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, या चर्चेवर टिप्पणी करण्याची ही योग्य वेळ नाही. सुनेत्रा पवार, या पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यांचे याबाबत काय मत आहे, हे त्या स्वतः सांगतील. त्यामुळे या विषयावर टिप्पणी करण्याची माझी कोणतीही भूमिका नाही.

पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. पक्ष जिथे मला पाठवेल, तिथे मी जाईन. आसाम आणि केरळ या दोन राज्यांमध्ये तरी मी निवडणूक प्रचारासाठी जाणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.