Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

इराणचा नवनियुक्त सर्वोच्च नेता अराफी यांनाही मारलं

इराणचा नवनियुक्त सर्वोच्च नेता अराफी यांनाही मारलं

दिल्ली : वृत्तसंस्था 

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध पेटले आहे. इस्त्रायल आणि अमेरिका मिळून इराणवर हल्ला करत आहे. अनेक क्षेपणास्त्र टाकली जात आहेत. इराणमधील प्रमुख शहरे निशाण्यावर आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला.

त्यानंतर लगेचच नव्या सर्वोच्च नेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. सर्वोच्च नेते म्हणून अली रजा अराफी यांची निवड करण्यात आली. आयातुल्ला अली खामेनेई यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा जीव गेला. इराणमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, सरकारी इमारती पाडण्यात आल्या. त्यामध्येच अमेरिकेने अत्यंत मोठा दावा अमेरिकेकडून करण्यात आला. हा दावा इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबद्दल आहे, या दाव्याने खळबळ उडाली आहे.

इराणचे सर्वोच्च नेते अली रजा अराफी यांनाही हल्ल्यात ठार करण्यात आल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेने केला आहे. खरोखरच नव्या सर्वोच्च नेत्यालाही ठार केले का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमेरिकेच्या या दाव्यावर इराणकडून अजून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. उलट आपली लष्करी ताकद दाखवणारा व्हिडीओ त्यांनी शेअर केला.

इराणी लोक सरकारच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरल्याच बघायला मिळाले. त्यामध्येच अमेरिकेच्या दाव्याने जगात खळबळ उडाली. अली रजा अराफी मारले गेल्याचा दावा NSA ने केला. इस्त्रायलच्या न्यूक्लिअर प्लॅटवर इराणकडून मोठा धमाका करण्यात आला. या युद्धाच्या झळा अनेक खाडी देशांना बसताना दिसत आहेत. फ्रेंचची युद्ध नौका इराणच्या दिशेने निघाली आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट दावा करत म्हटले की, नवे सर्वोच्च नेते खामेनी यांना ठार करण्यात आले. या हल्ल्यात इस्त्रायलचे 100 सैनिक मारले गेल्याचा दावा इराणकडून करण्यात आला. हेच नाही तर इराणने अमेरिकेचे जेटही पाडले, ज्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. इस्त्रायलवर अधिक भीषण हल्ला करणार असल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. इराणवर अमेरिका मोठे हल्ले करत आहे. या युद्धाचा थेट फटका दुबईला बसल्याचे दिसत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.