Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी : रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक

दहावी परीक्षेला तोतया विद्यार्थी : रॅकेटच्या मास्टरमाईंडला सांगलीतून अटक

मंगळवेढा : खरा पंचनामा 

मंगळवेढा तालुक्यातील लक्ष्मी दहिवडी येथील सुतार प्रकरणात इंटरनॅशनल अँड ज्युनिअर कॉलेज स्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत तोतया विद्यार्थी बसविण्याच्या पोलिसांनी मोठी कारवाई करत या रॅकेटचा सांगलीतील मास्टरमाईंला अटक केली आहे. दरम्यान, संबंधित शाळेबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र पाठविले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

रविराज कोडकीर (रा. सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि.२० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मराठीचा पेपर सुरू झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्र व शाळेच्या ओळखपत्रांची तपासणी सुरू होती.

त्यावेळी केंद्र संचालक विठ्ठल एकमल्ली यांनी तपासणी केली असता दहा विद्यार्थी तोतया असल्याचे उघड झाले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी केंद्र संचालक विठ्ठल एकमल्ली यांच्या फिर्यादीवरून मूळ दहा विद्यार्थी आणि त्यांच्या जागी परीक्षा देण्यासाठी आलेले दहा तोतया विद्यार्थी अशा एकूण २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिसांनी यापूर्वीच एका मुलीसह दहा तोतया विद्यार्थ्यांना अटक केली आहे. पुढील तपासात या प्रकरणामागील मास्टरमाईंड रविराज कोडकीर याचा शोध घेऊन त्याला सांगली येथून ताब्यात घेण्यात आले.

विशेष म्हणजे कोडकीर हा लक्ष्मी दहिवडी येथील सुतार इंटरनॅशनल अँड ज्युनिअर कॉलेज स्कूलचा माजी विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.