Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत २ री आखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर २५-२६ महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

सांगलीत २ री आखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर २५-२६ महाराष्ट्र राज्य निवड चाचणी स्पर्धा उत्साहात

सांगली : खरा पंचनामा 

सांगलीत २ री आखिल भारतीय पोलीस बॅडमिंटन व टेबल टेनिस क्लस्टर २५-२६ महाराष्ट्र राज्य संघ निवड चाचणी स्पर्धा कोल्हापुर परिक्षेत्र अंतर्गत सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने घेण्यात आली. शहरातील आमराई ऑफिसर्स क्लब येथे दोन दिवस या स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
या निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेचे संयोजन सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक, कल्पना बारवकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
बैडमिंटन व टेबल टेनिस या क्रिडा प्रकारात निवड चाचणी स्पर्धेकरीता महाराष्ट्र पोलीस दलातील राजपत्रित (GOs) व अराजपत्रित (NGOs) महिला व पुरुष पोलीस अधिकारी व अंमलदार असे एकुण १६८ खेळाडु सहभागी झाले होते.
बॅडमिंटन व टेबल टेनिस या दोन्ही खेळाच्या निवड चाचणी (पुरुष व महिला) सिंगल, डबल्स आणि मिश्र डबल्स अशा विविध क्रिडा प्रकारातुन राजपत्रित (GOs) व अराजपत्रित (NGOs) खुला गट, ३५, ४०+, ४५, ५०, ५५ वयोगटातील पुरुष व महिलांमध्ये एकूण १९१ सामने घेण्यात आले. या निवड चाचणी स्पर्धामधून विविध गटातुन खेळांडुची २ च्या आखिल भारतीय क्लस्टर २०२५ २०२६ स्पर्धाकरीता महाराष्ट्र पोलीस संघाची निवड केली गेली.

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणेकरीता पोलीस निरीक्षक गजानन सरगर, सांगली, विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, सांगली शहरचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, जोतीराम पाटील, प्रशांत मारुलकर, राखीव पोलीस निरीक्षक बाळासाहेच अलदर, सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे सहकार्य लाभले.

सदर स्पर्धेकरीता प्रायोजक म्हणून पी. एन. जी. ग्रुप सांगली, क्लॉलिटी पॉवर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स लि. कुपवाड एमआयडीसी, ए. पी. बेकरी सांगली आणि आमराई ऑफिसर्स क्लब, सांगली यांचे सहकार्य लाभले.

या निवड चाचणी स्पर्धेत पोलीस दलातील अनेक राज्य आणि राष्ट्रीय खेळाडु सहभागी झाले होते. त्यामुळे सदर निवड चाचणी स्पर्धा अतिशय चुरशीच्या परंतु शिस्तबध्द आणि निकोप पार पडल्या. सदर निवड चाचणी करीता स्पर्धा निरीक्षक, सहायक क्रीडा अधिकारी संतोष कांबळे, तांत्रिक अधिकारी कमलाकर चव्हाण व स्पर्धा निवड प्रमुख तसेच पंच प्रमुख प्रा. अजय मराठे यांनी जबाबदारी पार पाडली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.