Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बागेश्वर बाबाला कोल्हापूरी चपलेने मारा अन् 1 लाख 51 हजार मिळवा!

बागेश्वर बाबाला कोल्हापूरी चपलेने मारा अन् 1 लाख 51 हजार मिळवा!

मुंबई : खरा पंचनामा 

बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते की, 'छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाहीय. तुम्ही एक दया करा की, हे मुकुट तुम्हा आता सांभाळा, हे राज्य सांभाळा.' यानंतर शिवप्रेमींनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबाच्या विरोधात धाराशिव मध्ये शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. जो कोणी बागेश्वर बाबाला कोल्हापूरी चपलेने मारेल त्याला धाराशिवच्या शिवप्रेमींनी 1 लाख 51 हजारांचे बक्षीस जाहीर केल आहे. धारशिव मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात यावेळी शिवप्रेमींनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाचन करुन बागेश्वर बाबाच्या फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमी सहभागी झाले होते.

हिंगोलीतील वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शिवप्रेमींकडून बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अक्षपार्य विधान केल्याच्या निषेधार्थ बागेश्वर बाबांची प्रतिमा जाळत निदर्शने करण्यात आली. तसेच पुणे शहरातही काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. बागेश्वर बाबा यांच्यावर कडक कारवाईच्या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

बागेश्वर बाबा व संजय गायकवाड यांच्या विरोधात शिवप्रेमींनी मालेगावात निदर्शने केली. शिवप्रेमींकडून दोघांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिली आहे. संबंधित व्यक्तींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन तीव्र करणार असही आंदोलकांनी म्हटले आहे.

अमरावतीत प्रहारकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रहार जनशक्ती पक्षाकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. निषेध असो, निषेध असो ढोगी बाबांचा निषेध असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शास्त्री यांच्याकडून महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण केली जात आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक कण्यात यावी अशी मागणी यावेळी प्रहार पक्षा कडून करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.