Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन

अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन

सोलापूर : खरा पंचनामा 

भोंदूबाबा अशोक एकनाथ खरात याने पुणे, शिर्डी, नाशिकसह अन्य मोठ्या शहरांमध्ये कोट्यावधींची मालमत्ता खरेदी केल्याची माहिती तपासात समोर आल आहे. आता खरातने सोलापुरात देखील कोट्यावधी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावात भोंदू अशोक खरात याने कोट्यावधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. कळमण गावातील गट क्रमांक 200/1 मधील 4.48 हेक्टर म्हणजे सुमारे 11 एकरांपेक्षा अधिक जमीन अशोक खरात यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे.

28 मार्च 2024 रोजी झालेल्या या व्यवहाराची किंमत तब्बल 2 कोटी 40 लाख 91 हजार 200 रुपये इतकी असल्याची नोंद खरेदीखतात आहे. या व्यवहारात अशोक खरातची पत्नी कल्पना अशोक खरात हिला कुलमुखत्यार म्हणून अधिकार देण्यात आलेले असल्याचेही खरेदी खतात नमूद आहे. विशेष म्हणजे उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण गावातून शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार कळमण गावात जमिनीचे साधारण भाव हे प्रति एकर 5-6 लाख रुपये प्रति एकर आहेत. मात्र भोंदू अशोक खरात याने तब्बल 21 ते 22 लाख रुपये प्रति एकर ही जमीन खरेदी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण हद्दीत पत्नीच्या नावे जमीन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नियोजित शक्तिपीठ महामार्ग कळमण हद्दीतून जाणार असल्याची माहिती मिळाल्याने भोंदूबाबा अशोक खरात याने ही जमीन खरेदी केली असल्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.