राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाने वर्षभरात दिला 609.29 कोटींचा महसूल!
गतवर्षीच्या तुलनेत 39 टक्क्यांनी वाढ : अधीक्षक प्रदीप पोटे
सांगली : खरा पंचनामा
विशेष मोहीम आणि मद्य निर्मिती घटकांवर प्रभावी पर्यवेक्षण यामुळे यंदाचे महसुली उद्दिष्ट साध्य झाले आहे. राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली जिल्ह्याला राज्य शासनाने दिलेल्या उद्दिष्टात 39 टक्क्यांनी वाढ झाली असून वर्षभरात 609.29 कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्कचे सांगलीचे अधीक्षक प्रदीप पोटे यांनी 'खरा पंचनामा'शी बोलताना दिली.
ते म्हणाले, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सांगली कार्यालयाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये शासनाकडून देण्यात आलेले महसुली उद्दिष्ट पूर्ण केले आहे. सन 2025-26 चे महसुली उद्दिष्ट 601.83 कोटी रुपयांचे होते. या वर्षात प्रत्यक्ष 609.29 कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. सन 2024-25 या वर्षात 437.79 कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. मागील वर्षाच्या तुलनेत 171.50 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महसुली वाढीची टक्केवारी 39% इतकी आहे.
जिल्ह्यात महसूल वाढीसाठी उत्पादन शुल्क विभागाच्या नियंत्रणाखालील विदेशी मद्यनिर्मिती कारखाने (IMFL): 02 आणि देशी मद्यनिर्मिती कारखाने (CL): 04 असल्याचे पोटे यांनी सांगितले.
अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर जिल्ह्याभरात करण्यात आलेली प्रभावी कारवाई, भरारी पथकांद्वारे राबवण्यात आलेली विशेष मोहीम आणि मद्य निर्मिती घटकांवर प्रभावी पर्यवेक्षण यामुळे महसुली उद्दिष्ट साध्य झाल्याचे अधीक्षक पोटे यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.