राजकारण नव्हे... आ. बंटी पाटील यांचे चिरंजीव व सून पद्मश्री डॉ. डी.वाय. दादांच्या परंपरेत शिक्षण क्षेत्रातच कार्य करणार!
स्वागत समारंभावेळी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चेचा सूर!
राजा माने
मुंबई : खरा पंचनामा
"काँग्रेसचा आश्वासक चेहरा" म्हणून ज्यांच्याकडे महाराष्ट्र पाहतो त्या माजी मंत्री बंटी तथा आमदार सतेज पाटील यांचे चिरंजीव तेजस यांचा विवाह व स्वागत समारंभ कोल्हापुरात मोठ्या थाटात नुकताच पार पडला. त्यानंतर आज मुंबईतील पत्रकारांसाठी वानखेडे स्टेडियम मधील एम सी ए लॉन्ज येथे स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आपुलकी व आस्थेवाईकपणे पत्रकारांचे स्वागत केले.
नवदाम्पत्य तेजस व सौ. स्नेहा यांना पत्रकारांनी शुभेच्छा दिल्या. आ. सतेज, ऋतुराज, तेजस व सौ. स्नेहा यांनी प्रत्येकाशी मनमोकळा संवाद साधला. अनौपचारिक गप्पा झाल्या. तेजस व सौ. स्नेहा आपले करिअर शैक्षणिक क्षेत्रात आपले कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या आपले आजोबा पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांच्या परंपरेत शिक्षण क्षेत्रातच करणार असल्याचा चर्चेचा सूर होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.