Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रुपाली चाकणकर पुन्हा 'अॅक्टिव्ह मोड'वर; नाशिकमध्ये भेटीगाठींचा सिलसिला

रुपाली चाकणकर पुन्हा 'अॅक्टिव्ह मोड'वर; नाशिकमध्ये भेटीगाठींचा सिलसिला 

नाशिक : खरा पंचनामा 

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे आणिअशोक खरात यांच्याशी असलेल्या अध्यात्मिक संबंधामुळे महिला नेत्या रुपाली चाकणकर मागील काही दिवसांपासून राजकीय पटलावरुन काहीशा दूर गेल्या होत्या.

मात्र आता एक महिन्याच्या कालावधीनंतर चाकणकर पुन्हा सामाजिक - राजकीय अंगाने अॅक्टीव्ह झाल्याचे पाहायला मिळाले. नाशिक येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत चाकणकर दिसून आल्या आहेत.

भोंदूबाबा अशोख खरात प्रकरणानंतर आता चाकणकर राजकीयदृष्ट्या पुन्हा सक्रिय झालेल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदूर या ठिकाणी कार्यकर्ता बैठक पार पडली. या बैठकीस चाकणकर देखीव उपस्थित होत्या. खरात प्रकरणानंतर आता रुपाली चाकणकर अॅक्टिव्ह झाल्या आहेत.

भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनामांची मालिका उघड होत गेली. खरात यांना चाकणकर आपले अध्यात्मिक गुरु मानत होते. त्यांच्याशी असलेल्या या संबंधांमुळे चाकणकर यांना राज्य महिला आयोग अध्यक्षपदावरुन राजीनामा द्यावा लागला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधूनही त्यांना महिला प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे, लागले होते. मात्र आता त्यांना पुन्हा कार्यकर्ता गाठीभेटी सुरु केल्याने, पुन्हा त्या राजकीय पटलावर सक्रिय झाल्या आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.