Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिवसेना नेते सोनू कल्याणकर खून प्रकरणात नवा ट्विस्टतरुणीची आईच निघाली मास्टरमाइंड, सुपारी देऊन संपवलं

शिवसेना नेते सोनू कल्याणकर खून प्रकरणात नवा ट्विस्ट
तरुणीची आईच निघाली मास्टरमाइंड, सुपारी देऊन संपवलं

नांदेड : खरा पंचनामा 

शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता सोनू कल्याणकर याच्या निघृण हत्या प्रकरणाच्या तपासात आता अत्यंत धक्कादायक खुलासा झाला आहे. जुन्या प्रेमसंबंधांचा राग मनात धरून झालेली ही हत्या तरुणीच्या भावाने नाही, तर तिच्या आईनेच कट रचून घडवून आणल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या इंदुबाई मंगनाळे या महिलेला ताब्यात घेतले असून, या घटनेने नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

६ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास श्रीनगर भागात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ३५ वर्षीय सोनू कल्याणकर याच्यावर चार हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची निघृण हत्या केली होती. सोनूचे १०-१२ वर्षांपूर्वी गोलू मंगनाळे याच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांना मुलीच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. कुटुंबीयांनी मुलीचे लग्न दुसरीकडे ठरवले होते, मात्र सोनूने ती सोयरीक मोडली होती. याच रागातून २०२१ मध्ये गोलू मंगनाळेने सोनूवर गोळीबारही केला होता, ज्यातून तो थोडक्यात वाचला होता.

सुरुवातीला या हत्येमागे तरुणीचा भाऊ गोलू याचा हात असल्याचा संशय होता. मात्र, भाग्यनगर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात इंदुबाई मंगनाळे (तरुणीची आई) हीच मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झालं. "जोपर्यंत सोनू मरणार नाही, तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही," असे शब्द इंदुबाईने आपल्या मुलाचा मित्र पियुष शिंदे याला म्हटले होते. या सूड भावनेतून तिने बँकेतून लाखो रुपये काढून मारेकऱ्यांना सुपारी दिल्याची कबुली दिली आहे.

मंगनाळे कुटुंबाची पार्श्वभूमी अत्यंत गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचं तपासात पुढे आलं आहे. आरोपी महिलेचा मुलगा गोलू मंगनाळे हा कुख्यात दहशतवादी रिंदा गँगचा सदस्य असून सध्या तो तुरुंगात आहे. तसेच, अन्य एका हत्या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती चंद्रविजय मंगनाळे यालाही अटक करण्यात आली आहे. आता सोनू कल्याणकर प्रकरणात पोलिसांनी तिलाही बेड्या ठोकल्या आहेत.

सोनू कल्याणकरची हत्या झाल्यानंतर नांदेड पोलिसांनी रोहित लोट, पियुष शिंदे, अंकुश गंधनवाड आणि मधू जोगदंड या चार मुख्य मारेकऱ्यांना घटनेच्या काही तासांतच बेड्या ठोकल्या होत्या. आता तपासाची सुई फिरल्यानंतर आई इंदुबाई मंगनाळे हिला मुख्य सूत्रधार म्हणून अटक करण्यात आली आहे. भाग्यनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.