विधान परिषदेसाठी मविआघडीचा उमेदवार ठरला?
मुंबई : खरा पंचनामा
राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मोठा राजकीय ट्विस्ट समोर आला आहे. महाविकास आघाडी मविआकडून उद्धव ठाकरे हेच उमेदवार असणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
याआधी उद्धव ठाकरे हे निवडणूक लढवण्यास फारसे इच्छुक नव्हते. पक्षातील इतर नेत्यांना संधी द्यावी, अशी त्यांची भूमिका होती. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांनी मनधरणी केल्यानंतर त्यांनी अखेर होकार दिल्याचे समजते.
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान १२ मे रोजी होणार असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल आहे. शेवटच्या दिवशीच ठाकरे अर्ज भरणार असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीकडे मर्यादित संख्याबळ असल्याने केवळ एकच उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांनीही यापूर्वी ठाकरे यांनी विधान परिषदेत जावे, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे मविआतील तिढा सुटल्याचे मानले जात आहे.
या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे. "ठाकरे जाणार हे आधीपासूनच ठरलेलं होतं, अनावश्यक चर्चा निर्माण करण्यात आली," असे त्यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे विधान परिषद निवडणुकीत आता नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.