Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठी-जैनांमध्ये भांडणे लावू नका, नाहीतर मुंबई सोडा ! हार्दिक हुंडिया यांनी जैन मुनी नयपद्मसागर यांना सुनावले

मराठी-जैनांमध्ये भांडणे लावू नका, नाहीतर मुंबई सोडा ! 
हार्दिक हुंडिया यांनी जैन मुनी नयपद्मसागर यांना सुनावले

मुंबई : खरा पंचनामा 

छत्रपती महाराणी ताराराणी जैन होत्या असे वक्तव्य करून वाद निर्माण करणारे जैन मुनी नयपद्मसागर यांच्यावर जैन समाजाचे नेते व प्रसिद्ध उद्योजक हार्दिक हुंडिया यांनी जोरदार टीका केली आहे.

"नयपद्मसागर यांनी मराठी आणि जैन बांधवांमध्ये भांडणे लावण्याचे काम करू नये. एक मुनी म्हणून तुमच्याकडे पुरेसे ज्ञान नसेल तर मुंबई सोडून गुरूकडे जाऊन ज्ञानप्राप्ती करावी," असा खोचक सल्लाही हुंडिया यांनी नयपद्मसागरना दिला.

"नयपद्मसागर यांनी केलेले वक्तव्य माफी करण्यालायक नाही. त्यांनी चुकीचे वक्तव्य करण्याची गरजच नव्हती," असे हुंडिया म्हणाले. "साधू हे सतत प्रवास करत असतात. धर्मशास्त्रानुसार काम करतात. आध्यात्मिक उन्नती आणि समाजात नैतिकतेचा प्रसार हे त्यांचे काम असते. मात्र नयपद्मसागर अनावश्यक गोष्टींत लक्ष घालतात. काही ना काही वादग्रस्त बोलत असतात. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नेत्यांनी अशा लोकांपासून दूर राहावे," असे आवाहन हार्दिक हुंडिया यांनी केले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.