Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हापीडितेला खरातकडे नेलं, वारंवार शारीरिक संबंधांची मागणी अन्...

ठाणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा
पीडितेला खरातकडे नेलं, वारंवार शारीरिक संबंधांची मागणी अन्...

ठाणे : खरा पंचनामा 

ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे महापालिकेचे माजी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आहेर हे कार्यरत असताना त्यांच्या कार्यालयातील एका महिलेला शीतपेयात गुंगीचे औषध देत अत्याचार केल्याचे तसेच आहेर यांनी तक्रारदार महिलेला नाशिक येथे भोंदू अशोक खरात याच्या कार्यालयात नेल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यावरून खरात यांचे ठाणे कनेक्शन समोर आले आहे. याप्रकरणी आहेर याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, २०२० ते २०२३ या कालावधीत तक्रारदार महिला ठाणे महापालिकेच्या पाचपखाडी विभागात कार्यरत होती. याच काळात तत्कालीन सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत त्या महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

हिरानंदानी इस्टेटमधील फ्लॅटवर नेऊन शीतपेयात गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारदार महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. तसेच या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोपही यात करण्यात आला आहे.

आरोपीकडून नौपाडा येथील घरातही जबरदस्तीचा प्रयत्न करण्यात आला. नाशिक येथे एका ज्योतिषाकडे नेऊन अघोरी प्रकार केल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. याप्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.