Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

माझे मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी मांडलेत; रोहित सिंगला अजून अटक का नाही?

माझे मुद्दे रोहितदादांनी ऑलरेडी मांडलेत; रोहित सिंगला अजून अटक का नाही?

मुंबई : खरा पंचनामा 

अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी मला जे मुद्दे मांडायचे होते, ते मुद्दे रोहित पवारांनी ऑलरेडी मांडलेत, अशी भावना दिवंगत अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

एखादी इमारत पडली तर त्या इमारतीच्या मालकाला अटक करतात, त्या इमारतीच्या इंजिनिअर्सना नाही. रेस्टॉरंटला आग लागली, तर रेस्टॉरंटच्या मालकाला अटक करतात. मग एवढा मोठा अपघात झाला असताना रोहित सिंगला (विमान कंपनीचे मालक) अजून का अटक झाली नाही? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

जय पवार यांनी शनिवारी अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारला झाल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामे करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले, बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वांची इच्छा आहे. शरद पवारांनीही आजच अशी भूमिका व्यक्त केली आहे. अजितदादांचे काम व प्रेम सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे बारामतीकरांचीही तीच इच्छा आहे. काँग्रेसने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्यांनी अजून आपला उमेदवार दिला नाही.

या प्रकरणी खूप घडामोडी घडत आहेत. या प्रकरणी आमचे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी बोलतील. गरज पडली तर आम्हीही त्यांच्याशी संवाद साधू. पण बारामतीकरांचे पवार कुटुंबीयांवर खूप प्रेम आहे. जनता अजूनही खूप भावनिक आहे. त्यामुळे विरोधकांना लढायचे असेल तर लढावे, पण बारामतीकर या निवडणुकीत काय करणार आहेत हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आम्ही अजित पवारांशिवाय निवडणूक लढवण्याची कल्पनाही केली नव्हती. मी यावर फार बोलणार नाही. मी फार भावनिक आहे. मी सर्वांपुढे याविषयी बोलणार नाही, असे ते म्हणाले.

पत्रकारांनी यावेळी जय पवार यांना विमान अपघातावर तुम्ही एक पत्रकार परिषद घेणार होता, ती अजून का घेतली नाही, असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, ही पत्रकार परिषद न घेण्याचे काहीही कारण नाही. जे मुद्दे मला बोलायचे होते, त्या मुद्यातील काही मुद्दे ऑलरेडी रोहित पवारांनी सांगितले आहेत. मला जे मुद्दे बोलायचे होते ते मुद्दे रोहितदादांच्या पत्रकार परिषदेत कव्हरअप झाले. त्यामुळे या प्रकरणी जोपर्यंत फायनल अहवाल येत नाही, तोपर्यंत मी त्यावर बोलून उगीचच संभ्रम पसरवू नये. आम्हाला वैयक्तिक पातळीवर जे वाटते ते वाटते, पण जेव्हा अंतिम अहवाल येईल तेव्हा तुमच्यापुढे येऊन सर्वकाही स्पष्ट करेन.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.