Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बारामती विधानसभा पोटनिवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल

बारामती विधानसभा पोटनिवडणूकीसाठी पहिल्याच दिवशी तीन उमेदवारी अर्ज दाखल

बारामती : खरा पंचनामा 

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. यासाठी २३ एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.

यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, या तिघांपैकी एकही उमेदवार बारामती मतदारसंघातील नाही.

बारामती पोटनिवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये जत तालुक्यातील सतीश कृष्णा कदम यांनी हिंदुस्तान जनता पार्टीकडून, सातारा येथील सागर शरद भिसे यांनी अपक्ष म्हणून, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील राघू घुटुकडे यांनी न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, बारामती व राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी 23 एप्रिल 2026 रोजी मतदान होणार असून, 4 मे रोजी मतमोजणी पार पडणार आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व बारामतीचे आमदार अजित पवार तसेच राहुरीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत.

अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात असणार हे निश्चित आहे. त्यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत कोणा-कोणाचा अर्ज कायम राहतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अक्षय शिवाजीराव कर्डिले यांना उमेदवारी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.