अवैध व्यवसायिकाकडून पैसे घेणाऱ्या दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन
पुणे : खरा पंचनामा
पोलिस आयुक्त अमितेशकुमार सातत्याने अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देत असताना एक कर्मचारी 'व्हिडीओ'त अवैध धंदेवाल्याकडून पैसे घेताना कैद झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
यामुळे शहर पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस उपायुक्तांनी याप्रकरणाची चौकशी करून दोन पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले आहे. सहाय्यक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड तसेच पोलिस हवालदार अमोल प्रकाश पवार असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नावे आहेत. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल पवार व बापुसाहेब खुटवड हे सहकारनगर पोलिस ठाण्यातील तपास पथकात कर्तव्यास आहेत. दरम्यान गेल्या महिन्यात अमोल पवार हे एका अवैध धंदे करणाऱ्यांकडून पैसे घेत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये पैसे स्वीकारतानाचे दृश्य स्पष्टपणे दिसत असल्याने हा प्रकार गंभीर मानला जात होता. यामुळे पोलिस दलात देखील मोठी कळबळ उडाली होती. यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा सुरू झाली होती.
याप्रकरणाची तातडीने दखल घेण्यात आली. पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी यासंदर्भाने चौकशी सुरू केली. चौकशीनंतर अमोल पवार यांच्यासह बापुसाहेब खटवड यांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. "शिस्तभंग व पोलिस दलाची प्रतिमा सर्वसामान्यांमध्ये मलीन केल्याचा ठपका" ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेमुळे शहरातील पोलिस दलातच नव्हे तर नागरिकांमध्येही मोठी चर्चा रंगली आहे. कायद्याचे रक्षकच अशा प्रकारात अडकत असल्याने पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.