Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बारामतीमधून काँग्रेसची अखेर माघार

बारामतीमधून काँग्रेसची अखेर माघार

बारामती : खरा पंचनामा 

बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघ्या तीन तासांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चर्चा केली असून ही निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे.

शरद पवार वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत असतानाच राज्यातील काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीत माघार घेणार असल्याचे जाहीर केले आहे. विजय वडेट्टीवार यांनी आम्ही निवडणुकीत माघार घेणार असल्याचे हायकमांडला कळवणार असल्याचे म्हटले आहे.

ते म्हणाले, एकुण आमच्या लोकांची भावना लक्षात घेता या निवडणुकीत थांबवे, असे आमचे एक मत झाले आहे. आज प्रदेशाध्यक्ष हायकमांडच्या कानावर ही गोष्ट घालून आम्ही निर्णय घेऊ.

लोकप्रतिनिधीचे निधन झाले तर ती जागा बिनविरोध करायची असा प्रथा परंपरा होती. मात्र मागील काही काळापासून भाजपने ही परंपरा पाळल्याचे दिसून येत नाही. प्रथा परंपरा कोण पाळत नाहीत म्हणून आम्ही यावेळी आम्ही फॉर्म भरला होता, असे देखील त्यांनी सांगितले.

अजितदादांवर नेता म्हणून अनेकांचे प्रेम होते. महाराष्ट्रातील जनतेमध्ये त्यांचे स्थान होते. त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या मैदानात असल्याने आम्हा तीन नेत्यांमध्ये एकमत झाले आणि माघारीचा निर्णय झाला, हा निर्णय आम्ही पक्षश्रेष्ठीना कळवू ते योग्य निर्णय घेतील.

बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केल्याची माहिती आहे. काँग्रेसने यापूर्वी भाजपकडून आपल्या संपर्क साधला गेला नव्हता, असे सांगितले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.