'कैसे हराया..' फेम MIM नगरसेविकेचे पद जाणार; तहसीलदारांकडून मोठी कारवाई
ठाणे : खरा पंचनामा
महापालिका निवडणूक निकालानंतर राज्यात चर्चेत आलेली युवा नगरसेविकेचे पद धोक्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा येथील एमआयएमची नगरसेविका सहर शेखचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी दिला आहे.
सहर शेख आणि वडील युनुस शेख यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी शिफारस उमेश पाटील यांनी आपल्या अहवालात केली आहे. उपविभागीय जिल्हाधिकारी ठाणे आणि कोकण विभाग जातपतडताळणी समितीकडे शिफारस केली.
सहरच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याची तक्रार सिद्दीकी अहमद यांनी केली होती. सहर हिच्याविरोधात सिद्दीकी अहमद यांनी तक्रार केली होती. त्यावर चौकशी करण्यात आली. त्यात सहर दोषी असल्याचे आढळले आहे. आता सहरचे नगरसेवकपद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या प्रकरणाची चौकशी ठाण्याचे तहसीलदार उमेश पाटील यांनी केली. उमेश पाटील यांनी याबाबतचा अहवाल तयार केला. जातपडताळणी विभाग, निवडणूक विभाग आणि ठाणे उपविभागीय जिल्हाधिकारी कार्यालय यांची फसवणूक केल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एमआयएमची नगरसेविका सहर शेख ही मुळची उत्तर प्रदेश राज्यातील गाझियाबाद येथील रहिवाशी आहे.
नगरसेवक झाल्यानंतर त्यांच्या जल्लोष साजरा करताना आपल्या भाषणावेळी 'कैसे हराया..' असे मिश्किलपणे सहर भाषणात म्हणाली होती. तिचा हा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.