Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

परतवाडा प्रकरणात ४ आरोपींना अटक, चौकशीसाठी SIT स्थापन

परतवाडा प्रकरणात ४ आरोपींना अटक, चौकशीसाठी SIT स्थापन

अमरावती : खरा पंचनामा 

अमरावतीच्या परतवाडा येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अमरावती पोलिसांनी दिली आहे. "या प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं आहे.

या प्रकरणाचा तपास आता SIT मार्फतच होईल. या टीममध्ये दोन महिला अधिकाऱ्यांसह एकूण ११ अधिकारी आणि जवळपास ४० कर्मचारी आहेत. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि सायबर सेलचे पोलीस निरीक्षक (PI) सुद्धा या टीमचा भाग आहेत. आम्ही आतापर्यंत एकूण ४ आरोपींना अटक केली आहे. आणखी २ आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर ४ आरोपींची चौकशी सुरू असून, आम्ही ५ मोबाईल फोन जप्त केले आहेत," अशी माहिती अमरावती ग्रामीणचे एसपी विशाल आनंद सिंगुरी यांनी दिली.

कुठल्याही परिस्थितीत पीडितांची ओळख उघड करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे. "शेवटी. पीडित मली आणि त्यांच्या आवाहनही त्यांनी केलं आहे. "शेवटी, पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांना माझी विनंती आहे की, त्यांनी नेमलेल्या महिला अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. या अधिकाऱ्यांचे नंबर आधीच सार्वजनिक करण्यात आले आहेत. तुम्ही तुमच्या सोयीची जागा आणि वेळ निवडून गोपनीय पद्धतीने तुमचा जबाब नोंदवू शकता. तुमची ओळख गोपनीय ठेवण्यासाठी आम्ही तुमचा जबाब सीलबंद ठेवू, याची खात्री देतो. याची वैयक्तिक जबाबदारी मी घेतो," असंही ते म्हणाले.

दरम्यान, या घटनेत सामील असलेल्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असं AIMIM नेते वारिस पठाण यांनी म्हटलं आहे. "त्या (आरोपी) व्यक्तीशी आमचा काहीही संबंध नाही. या घटनेत जे कुणी सामील आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. भाजपच्या नेत्यांनी वातावरण खराब करू नये आणि पोलिसांना त्यांचं काम करू द्यावं," असं पठाण यांनी एएनआयशी बोलताना सांगितल.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.